कुडाळ
कणकवली
सावंतवाडी
वेंगुर्ला
मालवण
वैभववाडी
दोडामार्ग
भजनी बुवा समीर कदम यांच्या निधनाने कदम कुटुंबीयांचे सांत्वन
माजी आमदार वैभव नाईक यांनी पोखरण येथे घेतली कुटुंबीयांची भेट कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पोखरण गावचे सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पोखरण गावासह परिसरातील भजनप्रेमी, वारकरी आणि धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली…
OBC प्रमाणपत्राचा तिढा सुटला ! आ. प्रमोद जठारांच्या पाठपुराव्याबद्दल समाजबांधवांची कृतज्ञता
कासार्डेत आमदार प्रमोद जठारांचा ओबीसी समाज बांधवांकडून भव्य नागरी सत्कार, कृतज्ञतेचा वर्षाव कणकवली (प्रतिनिधी) : वैश्यवाणी समाजातील पात्र घटकांना OBC प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी लावून धरलेल्या पाठपुराव्याला अखेर…
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वार खारेपाटण चेक पोस्ट येथे आरोग्य पथक तैनात
खारेपाटण (संतोष पाटणकर ) : “आपला गाव आरोग्य संपन्न गाव “या अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या गणेश भक्त वचाकरमान्यांच्या स्वागतासाठी व त्यांच्या आरोग्याच्या देखभाली दृष्टीने सिंधुदुर्ग…
तळेरे येथे ‘टेक गुरु मोबाईल’ दालनाचा शुभारंभ; आधुनिक मोबाईल सेवा आता ग्राहकांच्या सेवेत
तळेरे (स्वप्नील तांबे) : ग्राहकांना आधुनिक, दर्जेदार आणि विश्वासार्ह मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तळेरे येथे ‘टेक गुरु मोबाईल’ या नव्या दालनाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. या दालनामध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन, मोबाईल अॅक्सेसरीज तसेच मोबाईलशी संबंधित विविध सेवा उपलब्ध…
कोकणातील गणेशभक्तांना घेऊन ‘शिवसेना एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना
मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी मुंबईतून आपल्या कोकणातील गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी यंदाही ‘शिवसेना एक्सप्रेस’ विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. कोकणकरांचा प्रवास मोफत आणि सुरक्षित व्हावा, या उद्देशाने सालाबादप्रमाणे यंदाही या विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले. आज दि. १२ सप्टेंबर २०२६…
रस्त्याच्या डागडुजी चे आश्वासन मिळाले व ओसरगाव ग्रामस्थांनी थेट ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला
ठाकरे सेनेचे कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांच्याकडून गणेश चतुर्थी पूर्वी रस्त्याची ग्वाही लोकप्रतिनिधींची आंदोलनाकडे पाठ झाल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथील परबवाडी अपराधवाडी परिसरातील रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून रस्ता पूर्ण करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळपासून…
मुंबईहून सावंतवाडीला जाणाऱ्या जादा बसला आरवली नजीक अपघात
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गांवर आरवली नजिक खेरशेत कासे फाटा येथे मुंबईहून सावंतवाडी येथे एम एच १४ एम एच ६४५० बस ला जाणाऱ्या एसटी बस ला अपघात झाला. अपघातात एसटी चे ब्रेक न लागल्याने पुढच्या सोळा टायर ट्रक ला…
मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सोडलेली पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना
आमदार नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्टेशनवर दाखवला झेंडा चाकरमानी गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री, तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांकरिता सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी पर्यंतची मोदी…
कणकवलीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा
नगरपंचायतीचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : ‘आनंद निर्मितीचा, वसा पर्यावरण रक्षणाचा’ या संकल्पनेतून कणकवली नगरपंचायतीतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. कणकवली शहरातील नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ…
शिवसेना जानवली जि.प. विभागप्रमुख पदी रविंद्र खांदारे
शिवसेना जिल्हाप्रमुख, मा. आ. वैभव नाईक, कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुक्यातील जानवली जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी श्री. रविंद्र नामदेव खांदारे (रा. सावडाव) यांची नेमणूक करण्यात आली आहे.…
ओसरगाव नालंग घर ते तोरसकर घर रस्त्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन
तात्पुरती डागडुजीसह खडीकरण – डांबरीकरणाचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथील नालंग घर ते तोरसकर घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले. गेल्या सुमारे ४० वर्षांपासून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण…
जामसंडे येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू
देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील जामसंडे धोपटेवाडी येथील प्रणिता प्रकाश जोईल (वय ४५) यांचे गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणिता…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत ‘मिशन ऑल आऊट’
पटवर्धन चौकातील अवैध पार्किंगवर कारवाई; दिवसभरात १५ हजारांचा दंड वसूल कणकवली (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि गणेशोत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेता कणकवली पोलिसांकडून ‘मिशन ऑल आऊट’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा…
कणकवली पटवर्धन चौकातील अवैध स्टॉलवर नगरपंचायतीची कारवाई
कणकवली (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील अतिक्रमण व अनधिकृत स्टॉलविरोधात नगरपंचायतीने पुन्हा कारवाईची भूमिका घेतली आहे. पटवर्धन चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या अवैध स्टॉलवर कारवाई करण्यासाठी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील स्वतः गुरुवारी दुपारी १२ वाजता घटनास्थळी दाखल झाल्या. स्टॉल हटविण्याच्या…
गणेश चतुर्थी पूर्वी सहाय्यकामार्फत ई पीक पाणी च्या नोंदी करून घ्या
अन्यथा शेतकऱ्यांना ई पीक पाणी करण्याचे अधिकार द्या माजी आमदार वैभव नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची ई-पीक पाहणी करण्यासाठी ‘पीक पाहणी सहाय्यक’ यांची नेमणूक केली आहे. परंतु एक किंवा दोन व्यक्तींकडे…
सुप्रसिद्ध बुवा समीर कदम यांच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन
उपचारासाठी सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित भजनप्रेमींसह समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या मधुर आवाजाने, भक्तिमय भजनाने आणि कलेच्या माध्यमातून अनेक वर्षे भजन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे समीर रामा कदम (भजनी बुवा), रा. पोखरण…
गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने अलर्ट मोडवर रहा पालकमंत्री नितेश राणे
तयारी पूर्ण; उत्सव कालावधीत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करा जिल्हावासीयांनी आनंदात व सुरक्षितपणे गणपती उत्सव साजरा करावा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी तसेच नागरिकांना सुरक्षित, शांततापूर्ण आणि आनंददायी वातावरणात…
जिल्ह्यात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : न्यायप्रक्रियेला गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात…
विषारी द्रव प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील रहिवासी व मूळ हिंदळे येथील सौ. रजत रामचंद्र हिर्लेकर (५३) यांनी हिंदळे येथील राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केल्याने मृत्यू झाला. ही रजत घटना मंगळवारी सायंकाळी घडली. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रकिया सुरू…
भाजपच्या जिल्हा कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार प्रमोद जठार यांच्याकडून पाहणी कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयाचे कणकवली शहरात उपजिल्हा रुग्णालयासमोर उभारण्यात येत असलेल्या नवीन कार्यालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या कार्यालयाच्या सुरू असलेल्या कामाची भाजपचे…



























































